उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदीसाठी जाहीर झाल्यावर उस्मानाबाद शहरात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, गुलाल उधळून जल्लोष केला.तसेच एकमेकांना पेढे भरविण्यात आले. त्यानंतर काही वेळातच शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, डॉ. तानाजी सावंत यांच्या नावाच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. 

या आनंदोत्सवासाठी माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, योगेश तुपे, प्रणिल रणखांब, विलास लोकरे,सागर कदम, मेसा जानराव, आकाश माळी, अविनाश टापरे, दिनेश तुपे, लखन झिरमिरे, विशाल हिंगमिरे, मयुर आडसुळ आदी उपस्थित होते.   


 
Top