तुळजापूर  / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील  उस्मानाबाद रोडवर असणाऱ्या  सार्वजनिक स्मशानभूमित प्रचंड गैरसोय असल्याने मरणानंतर ही अंत्यसंस्कार वेळी मयताला अनंत हालहापेष्टा सहन करीत वैकुंटगमनला जावे लागत आहेत. गेली दहा वर्षापासुन या स्मशान भूमीची अशीच अवस्था आहे.

या स्मशान भूमीत झाडेझुडपे वाढले आहेत. पावसाळ्यात बसण्यासाठी निवारा नाही, परिसरात घाणीचे साम्राज्य असुन विशेष म्हणजे येथे  पाण्याची सोय नाही आजूबाजूच्या घरातुन पाणी आणुन मयताला शेवटचे पाणी पाजावे लागत आहे. विद्युतची सोय नसल्याने येथे राञी  वाहनांचा प्रकाशझोतात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 

 तिर्थक्षेञ तुळजापूर येरे तीन मोठ्या सार्वजनिक स्मशान भूमी असुन त्यात शुक्रवार पेठ भागातील  समाधीवाड्या शेजारील स्मशान भूमी नव्याने बांधुन ही तिथे सोयीसुविधा उपलब्ध   नसल्यामुळे जवळपास अर्धा शहराचा भागातील सर्वसामान्य वर्गातील सर्वजातीधर्माचा मयतांनवर उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या स्मशानभूमित  अंत्यसंस्कार केले जातात. समाधीवाडा स्मशान भूमी कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांन मधुन केली जात आहे. 


 
Top