तुळजापूर  / प्रतिनिधी-

 येथील पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस फौजदार कार्यरत असलेले कल्याण माणिकराव पवार यांची खात्यातंर्गत पोलिस उपनिरक्षकपदी  निवड झाली असुन यानिवडीचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.

पोलिस उपनिरक्षक कल्याण पवार यांनी पोलिस मुख्यालय धाराशिव,  पोलिस स्टेशन  उमरगा, कळंब , येरमाळा , नळदुर्ग , परंडा येथे काम करुन ते तुळजापूर पोलिस ठाण्यात आले होते. त्यांना या मिळालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे .त्यांच्या  या पदोन्नती बद्दल पोनी अजिनाथ काशीद व एपीआय चासकर, कांबळे , चेनशेट्टी सह पोलिस कर्मचाऱ्यानी त्यांना पेढा भरवून अभिनंदन केले. 


 
Top