उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 35 वर्षीय मनोरुग्न पुरुषाची 3 जुलै रोजी सकाळी 8 वा. येडशी ते लातूर रोड वर हॉटेल सम्राट समोर डोक्यावर मार लागल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

   मयत पुरुषाची उंची 167 सेंमी, शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा , वाढलेली दाढी काळी पांढरी, काळे पांढरे केस अस्तवेस्त वाढलेले आणि फक्त फाटलेल्या शर्टात अर्धनग्न अवस्थेत असा वर्णन आहे.या मयत इसमाबद्दल किंवा त्यांच्या नातेवाईंकाबाबत ग्रामीण पो. स्टेशन येथे 02472-222991 या दूरध्वनीवर अथवा हेड कॉन्सटेबल ए.डी शिंदे 9423339798 यांना या भ्रमणध्वनीवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top