उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुंबई येथील उच्च न्यायालयात दाखल PIL No.40/2007 WITH CIVIL APPLICATION NO. 37/2018 मध्ये दि.11 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये धर्मादाय आयुक्त कार्यालयास दि.01 एप्रिल 2010 ते दि.31 मार्च 2021 या कालावधीतील नोंदणीकृत न्यासांकडून वार्षिक तीन टक्के दराने (Gross annual Income/of gross annual collection or receipt) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,1950 चे कलम 58 नुसार जमा होणाऱ्या रक्कमेचा तपशील मुंबई उच्‍च न्यायालयात सादर करावयाचा आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून माहिती मागविली जात आहे.

  महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 32, 33 आणि 34 अन्वये नोंदणीकृत न्यासांनी, त्यांच्या वार्षिक हिशेबपत्रकाचे/हिशेबपत्रकांचे अद्यापपावेतो लेखापरिक्षण करुन घेऊन, संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करुन घेणे आवश्यक आहे. परंतु  या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, नोंदणीकृत न्यासांपैकी बहुतांश न्यासांनी अद्यापपर्यंत हिशेबपत्रके दाखल केलेली नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. ती महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 66 आणि 67 67 अन्वये दंडनीय आहे.

   याद्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,1950 अन्वये राज्यातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक न्यासांना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,1950 च्या कलम 33 अन्वये त्यांच्या वार्षिक हिशेबपत्रकाचे/हिशेबपत्रकांचे लेखा परिक्षण (Audit) करणे अनिवार्य आहे, अशा सार्वजनिक न्यासांपैकी ज्या न्यासांनी अद्यापर्यंत मागील प्रलंबित आणि दि.31 मार्च 2021 रोजीपर्यंतच्या त्यांच्या अद्ययावत वार्षिक हिशेबपत्रकाचे/हिशेबपत्रकांचे लेखापरिक्षण (Audit) केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ करुन घ्यावे आणि संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने दाखल करावीत.

 ज्या न्यासांनी लेखापरिक्षण केलेले आहेत, परंतु 2016 पर्यंत प्रत्यक्षरित्या आणि 2016 नंतर ऑनलाईन संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेले नाहीत त्यांनी ऑनलाईन पध्दतीने दाखल करावीत. जर त्यांना ऑनलाईन पध्दतीने दाखल करण्यास अडचण येत असेल, तर त्यांनी संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून दि. 25 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने दाखल करावीत.

 सार्वजनिक न्यासांशी संबंधित सर्व सनदी लेखापाल, विधिज्ञ तसेच अधिकृत लेखापरिक्षक यांनीदेखील संबंधित न्यासांना उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुषंगिक निर्देश द्यावेत आणि न्यासांचे अद्ययावत वार्षिक लेखापरिक्षित हिशेबपत्रके कोणत्याही परिस्थितीत दि.25 जुलै 2022 रोजीपर्यंत संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन दाखल करावीत.

  उपरोक्त सूचनेनुसार हिशेबपत्रके दाखल न केल्यास नियमानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी केले आहे.

 
Top