उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद पोलिस दलात ३० जुलै ते १ ऑगस्ट या तीन दिवसांत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ३० जुलै रोजी पोलिस मुख्यालयातील क्रीडांगणावर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह पोलिस निरीक्षक अरविंद दुबे, सहपोलिस निरीक्षक विनोद चौधरी, शैलेश पवार, खेळाडू आदींची उपस्थिती होती.