उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 46.8 टक्के पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 8:00 वाजेपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात 38.8 मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 282.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 257 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 603.10 मि.मी. पाऊस होतो.

  जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुक्यात झालेल्या पावसाची माहिती मिली मीटरमध्ये अशी. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत. उस्मानाबाद – 42.5 (258.5), तुळजापूर – 33.9 (340.8), परंडा – 32.3 (210.6), भूम – 36.2 (264.9), कळंब – 49.1 (283.5), उमरगा – 36 (298), लोहारा – 37.3 (261.5) आणि वाशी - 42.7 (354) मिलीमीटर. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वाशी तालुक्यात 354 मि.मी. झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस परंडा तालुक्यात 210.6 मि.मी. झाला आहे.


 
Top