तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील तामलवाडी येथे घरासमोर लावलेली आयशीर कंपनीची मिनीट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, मोसीन दस्तगीर शेख ( रा.तामलवाडी) यांनी आपल्या घरासमोर मिनीआयशर कंपनीची ट्रक क्रमांक (एमएच २४ यु ००२६) लावली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांन विरोधात तामलवाडी पोलिस ठाण्यात गुरंन ९४/२०२२कलम भा दं सं कलम ३७९अन्वय गुन्हा नोंद केला आहे.