उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हाभरात अनेक गुन्हे दाखल असलेल्या देवळाली येथील श्रीहरी बापू यास पोलिसांनी बुधवारी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळाली येथील गुंड प्रवृत्तीच्या श्रीहरी बापू कडके उर्फ बापू वय २६ वर्षे, याच्यावर जिल्हाभरात अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या वास्तव्यामुळे समाजात दहशत निर्माण होत होती. त्यामुळे त्यास स्थान बध्द करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी आठ जून रोजी मान्यता दिली. त्यानुसार ‘महाराष्ट्र झोपडपट्टी, गुंड व विघातक कृत्यांना आळा घालने अधिनियम’ कलम- ३ (२) अंतर्गत कडके याची एक वर्षासाठी स्थानबद्धता मंजुर केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आज तत्काळ कडके यास ताब्यात घेउन त्याची रवानगी ‘हर्सुल मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद’ येथे केली आहे.

 
Top