उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील संकल्प बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. आदर्श महिला पतसंस्थेच्या कार्यालयात या विद्यार्थ्यांना या साहित्याचे वितरण करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष त्रिंबक कपाळे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष एच. व्ही. भुसारे यांनी संस्था गरीब विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करीत असून या विद्यार्थ्यांनी आनखी कांही अडचणी असल्यास संस्थेशी संपर्क साधावा तसेच विद्यार्थ्यांनी कष्ट घेवून, जास्तीत जास्त अभ्यास करुन आई - वडीलांचे स्वप्न साकार करावे असे आवाहन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष त्रिंबक कपाळे, उपाध्यक्ष एच. व्ही. भुसारे, सचिव प्रकाश स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी वैष्णवी बालाजी क्षिरसागर, श्रावणी रामकृष्ण क्षिरसागर, अनुष्का सुभाष ठोंबरे, अलमास करीम पठाण, मयुर रामेश्वर मस्के, इश्वरी तुकाराम शिंदे, रोहन गोपाळ साखरे इत्यादी विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सदस्या सविता विभुते, अर्चना पाटील, पतंगे मॅडम आदी उपस्थित होत्या. शेवटी प्रकाश स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले.


 
Top