तुळजापूर / प्रतिनिधी-

भारतातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या वाराणसीच्या श्री विश्वेश्वराची पूजा व अभिषेक करून रोहित दादा पवार यांनी गंगा आरती केली व राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक स्थळांना या गंगाजल अभिषेक व दर्शन व्हावे या गंगाजलाचे शेकडो कलश तयार करून राज्यातील धार्मिक व आध्यात्मिक तीर्थक्षेत्र असलेले आई तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर येथे पाठवून तुळजाभवानी ट्रस्ट व पुजारी यांच्या हस्ते स्थानिक प्रथेपरंपरेनुसार पूजा व अभिषेक करून राज्याच्या व देशाच्या हितासाठी कल्याणासाठी प्रार्थना केली.

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा ताईसलगर त्यांच्यासमवेत आलेले ऋषिकेश करभजन, रामदास धुताळ राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ   शिंदे,  ज्येष्ठ नेते दिलीप   मगर, धनंजय   पाटील, बबन गावडे, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, अमर  चोपदार, विवेक शिंदे, गणेश नन्नवरे,  संकर्षण देशमुख, रोहित चव्हाण, समर्थ पैलवान, गोविंद देवकर, बालाजी  कांबळे व कार्यकर्ते व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे गंगाजल कलश घेऊन रवाना झाले.

 

 
Top