उस्मानाबाद / प्रतिनिधी-

“गटसचिव श्री औदुंबर सूर्यवंशी यांचा थकीत पगार तात्काळ देण्याचे  आदेश   औद्योगिक न्यायालयाने  ज़िल्हा देखरेख संघ, डीसीसी बँक व सोसायटीला दिले आहेत., अशी माहिती अॅड. दिलीप मराठे यांनी दिली आहे. 

थकीत वेतन व वेळेवर वेतन मिळणेसाठी व सेवेत कायम करणेसाठी वाघोली येथील गटसचिव श्री औदुंबर सूर्यवंशी यांनी ऍडव्होकेट दिलीप मराठे यांचेमार्फत औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणी  औद्योगिक न्यायालयाने दि. 20/06/2022 रोजी अंतरीम आदेश दिले असून ज़िल्हा देखरेख संघ, डी सी सी बँक व सोसायटी ने गटसचिव श्री सूर्यवंशी यांना दि. 15 एप्रिल 2019 पासूनचे थकीत वेतन 15 दिवसाचे आत अदा करण्याचे व इथून पुढे नियमित वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत.सदर आदेशाचे पालन न केल्यास अवमान याचिका दाखल करणार असल्याचे अॅड. मराठे यांनी सांगितले.

 
Top