उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची असताना देखील सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी या हेतूने तसेच सत्ताधारी पक्षांशी संगणमत करुन आपल्या कनिष्ठ कार्यालयाने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने नगर परिषद उस्मानाबाद यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. तरी सदरील प्रारुप मतदार यादी तातडीने दुरुस्त करण्यात यावी भारतीय जनता पार्टी या प्रारुप यादीवर आक्षेप नोंदवित असून आपण यांची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी चर्चा करत मतदार यादीमधील त्रुटी व अडचणी मांडल्या त्याचबरोबर जिल्हा सह आयुक्त सतीश शिवणे यांच्याशी चर्चा करत मतदार यादीतील त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, ॲड.खंडेराव चौरे, सुनील काकडे, राहुल काकडे, अभय इंगळे, प्रवीण शिरसाठे, शेषराव उंबरे, बालाजी कोरे, दत्ता पेठे, बापू पवार, सुजित साळुंके, मेसा जानराव आदी उपस्थित होते.


 
Top