वाशी / प्रतिनिधी-

 तालुक्यातील फक्राबादचे सरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उस्मनाबाद जिल्हा कार्यध्यक्ष नितीन बिक्कड यंच्या   गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून शुक्रवार रोजी रात्री ९वा ३० मीनीटच्या सुमारास गोळीबार  करण्यात आला आहे . या वेळी बिक्कड यांच्या गाडीवर समोर काचावर एक गोळी झाडल्यामूळे गाडीच्या काचावर छिद्र पडल्या सारखे  झाला आहे . तर दुसरी गोळी पाठीमागे न लागता सुसाट गेली. 

पोलीसा कडून मिळालेली माहीती आशी, नितीन बिक्कड हे फक्राबाद येथे थांबले असता पारा या गावावरुण दोघाचे फोन आलते त्या मूळे बिक्कड हे स्वतःच्या महिंद्रा थार- एमएच २५ ए डब्लू  ६८६८ गाडीमध्ये बसून पारा या गावाकडे जात असताना मांजरा नदीवरील पुला वरुण  येत आसताना रोडच्या कडेला तोंडाला काळे बांधलेले दोन व्यक्ती  उभे राहीलेले दिसले व त्यानी गाडीला हात केल्या मूळे गाडी दमाने घेत असताना एकाने समोरुण गाडीच्या काचावर मध्यभागी गोळी झाडली व लगेच  दुसरी गोळी झाडल्याचा आवाज आला दुसरी गोळी गाडीला न लागता   सुसाट गेली .बिक्कड यानी गाडी न थांबवता पारा या गावाकडे आले व तेथून वाशी  पोलीस स्टेशन ला येवून माहिती दिली  या घटनेची माहीती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश दळवे यानी घटनेवर जाऊन पहानी केली .व या घटनेची फिर्याद  बिक्कड यानी  वाशी  पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुण दोन आज्ञान व्यक्तीच्या विरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला आहे . शनिवार रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक  -अतुल कुलवर्णी, गुन्हा शाखा विभागाचे -रामेश्र्वर खनाळ, दंबाळे साहेब , पथकाने घडलेल्या घटनेची स्थळ पाहणी करून माहिती घेतली व तपास प्रक्रीया चालू केली 


 
Top