उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित सामुदायिक उपनयन (मुंज) सोहळा येथील पुष्पक मंगल कार्यालयात  उत्साहात पार पडला. यावेळी 21 बटूवंर उपनयन संस्कार करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने सामुदायिक उपनयन (मुंज) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील पुष्पक मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात  बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले. बटूंना आर्शिवाद देण्यासाठी बटूंचे नातेवाईक, समाजातील नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा पुरोहित संघ, महिला मंडळ तसेच उस्मानाबाद जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


 
Top