तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील आगामी जिल्हापरीषद पंचायत समिती निवडणुकी साठी जिल्हापरिषद व पंचायत समिती गट गणाची  प्रारुप प्रभाग रचना  जाहीर करण्यात आली असुन तुळजापूर तालुक्यातुन एक जिल्हापरिषद गट तामलवाडी व दोन पंचायत समिती वडगावकाटी व केशेगाव   हे गण वाढुन सदस्य संख्या वाढली आहे.

खुदावाडीत पहिले नंदगणात गण  होता तो आता गट झाला. तामलवाडी काटगाव गटात गण होता तो गट झाला. येवती गण शहापूर गटात होता तो आता काटगाव गटात आला.जळकोट गटातील होर्टी गण रद्द होवुन किलज निर्माण झाला.

 जिल्हापरिषदचे १, पंचायत समितीचे २अशा सदस्य संखेत वाढ झाली आहे. नवीन गटगण रचना कुणाला फायद्याचे व कुणाला तोट्याची ठरणार हे माञ निवडणुक निकाल नंतर स्पष्ट होणार आहे.

तुळजापूर तालुक्यात शहापूर गट रद्द होवुन खुदावाडी गट नव्याने तयार करण्यात आला यात केशेगाव गट  नव्याने निर्माण झाला असुन व वडगावकाटी व केशेगाव  हे दोन गण निवडणूक आयोगाने नव्याने तयार केले आहेत.

 गट गण पुढीलप्रमाणे 

 गट कंसात गण

सिंदफळ (आपसिंगा ,सिंदफळ )

काक्रंबा (काक्रंबा सलगरादिवटी )

जळकोट (किलज जळकोट )

अणदूर (अणदूर चिवरी )

मंगरुळ (मंगरुळ,  आरळीब्रु )

काटी (काटी ,सावरगाव )

तामलवाडी (वडगावकाटी तामलवाडी )

काटगाव (काटगाव येवती)

खुदावाडी  (केशेगाव, खुदावाडी)

नंदगाव(हंगरगानळ ,नंदगाव )

 
Top