उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 १९९३ साली साधी भूकंप भूकंपग्रस्त योजनेअंतर्गत घर मिळाले होते परंतु गाव गुंडांनी मारहाण करून आमच्याकडील कबाला घेऊन अतिक्रमण केले आहे तरी आम्हाला अ.क्र. ४८ घर नंबर बी ८३ याचा कबाला व अतिक्रमण काढून देण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. 

 याची अनेक वेळा ग्रामपंचायत, तहसील कार्यालय लोहारा व जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत लेखी तक्रारी केल्या आहेत तरी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

उपोषणासाठी रामा दंडगुले, शांताबाई दंडगुले,आंबुबाई ईटकर, कांचन ईटकर, अनिकेत दंडगुले,आर्यन दंडगुले,लक्ष्मी पवार आदी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.


 
Top