उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी गावात दि. 21/06/22 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविदयालय आळणी (गडपाटी) उस्मानाबाद येथील कृषिदुतांनी व जिल्हा परिषद शाळा,चिलवडी येथे योग प्रात्यक्षिका द्वारे सर्व शिक्षक वृन्द व विद्यार्थी यांनी मिळून साजरा केला. हे कृषिदुत कृषि पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असून ग्रामीन जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगीक संलगन्ता उपक्रमाअतंर्गत दहा (१०) आठवडे चिलवडी या गावात कार्यरत राहणार आहेत. याप्रसंगी कृषिदुतांनी व तेथील शिक्षकानी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व नियमित योगा करण्याचे फायदे या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या वेळी महाविदयालयाचे प्राचार्य के. एच पाटील, कार्यक्रम समनवयक प्रा डी. एस शेटे, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस.ए दळवे सरांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक कसबे मॅडम,घुगे मॅडम,डुकरे मॅडम,डांगे सर,

बनसोडे सर व सोबतच गावातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जाधव, पोपटराव जाधव, रविंद्र जाधव, प्रशांत जाधव, आबासाहेब माळी उपस्थीत होते. या कार्यक्रमाप्रसंगी कृषिदुत श्रीकांत शिंदे, निरज शिंगाडे, वैभव राठोड, शुभम वाघमारे, चिंतन पाटील, ऋषिकेश रणदिवे, आदित्य पाटील, कृषिकन्या अंकिता म्हेत्रे, स्वाती शिंदे या कृषीदुतानी व कृषीकन्यांनी विशेष मेहनत घेतली.


 
Top