उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष उस्मानाबाद च्या संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, यापुढे जोपर्यंत पक्षाच्या नवीन नियुक्त्या होत नाहीत तोपर्यंत,उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फक्त प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन सक्रिय राहील याची माहिती प्रहार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी दिली तसे अधिकृत पत्र बच्चू भाऊ यांच्या आदेशाने काल प्रकाशित करण्यात आले ,तरी जिल्ह्यात स्वयंघोषित पदाचा सुळसुळाट अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे आणि पद नियुक्त्या करत आहेत या सर्व  बाबींना आळा घालण्यासाठी सदरील पत्र प्रसिद्ध करण्यात आले ,तर या पुढील काळात कोणीही स्वयंघोषित पद वापरू नये तसे आढळल्यास पक्षाच्या वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे

 
Top