उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षांनी   खा. शरदचं  पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 1999 पासून देशभर “प्रत्येक माणूस” हाच केंद्रबिंदू मानून समाजातील तळागाळातील वंचित घटक व देशाचा पोशिंदा शेतकरी बांधवांना डोळ्यासमोर ठेवून अविरत कार्यरत आहे.  वंचित घटकाला न्याय देणे व त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश राहिलेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सुरवातीपासूनच  खा.शरदचंद्र  पवार  ांच्यावर प्रेम करणारी व त्यांच्या विचारावर चालणारी आहे. समाजवादी काँग्रेस पासून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर्यंत खा पवार यांच्यासोबत खंबीरपणे राहिलेली आहे. आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या जनाधार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी संपूर्ण तकतीनिशी स्वबळावर निवडणुका लढविणार आहे. वर्धापदिनानिमित्त जिल्हाभरात वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला पक्ष क्रमांक एक वर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वस्व झोकून कामाला लागावे, महविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी केलेली कामे, करोना काळात लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून राज्यभर केली गेलेली कामे लोकांपर्यंत पोचवणे ही कार्यकर्त्यांची मुख्य जबदरी असून,  सभासद नोंदणी प्राधान्याने करण्यात यावी असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख,युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर,ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, जि.प.गटनेते महेंद्र काका धूरगुडे,प्रतापसिंह पाटील, संजय कांबळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण, सईद काझी, कळम शहराध्यक्ष मुसद्दी काझी,उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख,शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे, दत्ता पवार, अरुण माने, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, किसान सेलचे तालुकाध्यक्षऔदुंबर पाटील,ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब स्वामी,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश कांबळे, ॲड. योगेश सोन्नेपाटील,उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल,अनिकेत पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत फंड, किसान सेल ता. उपाध्यक्ष अमोल भातभागे, तालुका सचिव आश्रुबा गाढवे, युवक तालुका सचिवप्रविण लाडूळकर ,किसान सेल जिल्हाउपाध्यक्ष, सरताज शेख तालुका सरचिटणीस, नंदकुमार भुतेकर, बाळासाहेब स्वामी, राजकुमार पवार, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे, कमल चव्हाण,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण ,ज्योती माळाळे, युवती प्रभारी जिल्हाध्यक्ष श्वेता दुरुगकर, बालाजी तांबे, पृथ्वीराज चिलवंत, बाबा मुजावर, राजपाल दूधभाते, एस के इनामदार, आळणी सरपंच प्रमोद वीर, युवक तालुकाअध्यक्ष अमरसिंह देशमुख, महेश नलावडे, पृथ्वीराज आंधळे, सईदभाई काझी विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, रणवीर इंगळे, शेखर घोडके, मृत्युंजय बनसोडे, किरण साळवे, सेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,अमोल सुरवसे, महादेव माळी, नवनाथ राऊत,प्रतीक माने, बालाजी तांबे,जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.विशाल साखरे, सा. न्या. उस्मानाबाद शहर अध्यक्ष नारायण तुरुप, सां. वि जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, किरण साळवे, शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार महेश गंगणे, इस्माईल काझी, मन्नान काझी, प्रेमचंद मुंडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.तुषार वाघमारे यांनी दिली.

 
Top