तुळजापूर/ प्रतिनिधी- 

 तालुक्यातील हंगरगातुळ  येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या  न्यायालय इमारतीचे भूमिपूजन न्यायमूर्ती   मुकुंद गो. सेवलीकर, (उच्च न्यायालय, मुंबई ) यांच्या हस्ते यांच्या  शनिवार दि.२५ रोजी  संपन्न झाले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी    किशोर रा. पेठकर (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, उस्मानाबाद  )हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. व्ही.डी साळुंखे, चेअरमन बार कौन्सिल  ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि अॅड मिलिंद एस पाटील, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा  उपस्थित होते.

यावेळी बोलताना  मा न्यायमूर्ती   सेवलीकर म्हणाले की,तिर्थक्षेञ  तुळजापूर येथे उभारण्यात येणारी न्यायालयाची नूतन इमारत अद्यावत सर्वसेवा सुविधा युक्त  होणार आहे. या इमारतीत सीसीटीव्ही रूमची सोय आहे. पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच लिफ्ट आणि अपंगांसाठी रॅम्पची सोय आहे. 

 या इमारतीसाठी माजी न्यायमूर्ती आणि माजी पालक न्यायमूर्ती श्री जाधव  यांनी खूप परिश्रम घेतले आहे. तसेच   प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेठकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन अॅड संजय मैदर्गी यांनी तर आभार प्रदर्शन  मिलिंद  निकम दिवाणी न्यायाधीश क स्तर तुळजापूर यांनी केले.   यावेळी तुळजापूर विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष   दत्तात्रय घोडके, उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष  नितिन भोसले तसेच जिल्हातील सर्व न्यायिक अधिकारी, विधिज्ञ, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी, पत्रकार, न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top