तुळजापूर/ प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूरात ड्रेनेज लाईन तुंबण्याचा पार्श्वभूमीवर जेटींग मशीनच्या माध्यमातून शहरातील ड्रेनेज लाईन  चोकअप काढुन  स्वच्छता कामास लोहीया  गोपाळनगर  येथुन आरंभ झाला.

तिर्थक्षेञ तुळजापूरातील  ड्रेनेज लाईनचे  वर्षातुन एक वेळेस जेटींग मशीन द्वारे चोकअप काढुन स्वच्छता केली जाते. यंदा पावसाळा तोंडावर शुक्रवार दि.२४ पासुन ड्रेनेज लाईन चोकअप व स्वच्छता मोहीमेस गोपाळनगर येथुन आरंभ केला आहे.आज लोहीया  गोपाळनगर भागातील ड्रेनेज लाईन मधील चोकअप काढुन ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यात आला. जेटींग मशीन माध्यमातून शहरात पाच दिवस शहरातील ड्रेनेजलाईन मधील चोकअप  काढले जाणार आहेत तसेच मोठ्या नाल्यातील चोकआप या मशीन माध्यमातून काढले जाणार आहेत..

ड्रेनेज लाईन चोकअप काढणे व स्वच्छता  करण्याचे काम  सोलापूर येथील  सहा प्रशिक्षित कर्मचारी करीत असुन त्यांना  तुळजापूर येथील समृद्धी फँसिलिटी प्रा. लि कंपनीचे महादेव रसाळ, किशोर भोसले, संतोष लोंढे, दत्ता कसबे , जोतीबा अलझडे हे  करीत आहेत.


 
Top