उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रयतेचे राजे छञपती,राजर्षी शाहू महाराज यांनी बहूजन समाजाच्या शिक्षणाची सोय करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आपल्या संस्थानातील प्रशासनात नोकऱ्या दिल्या. या देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे कार्य छञपती शाहू महाराजांनी केले, असे प्रतिपादन प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात २६जून रोजी, शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त बोलताना केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर होते.प्रारंभी मान्यवरांनी छञपती शाहू महाराज यांच्षा प्रतिमाचे पुजन केले.  यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते

 
Top