तुळजापूर / प्रतिनिधी-

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी आज दि. ११ जून रोजी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले .

यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीला साकडे घालून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया होण्यासाठी व त्यांना उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभावे . महाराष्ट्रात मनसे पक्षाला येणाऱ्या निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळो,असे म्हणाले.   तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने नागेश शितोळे यांनी बाळा नांदगांवकर यांचा सपत्नीक सत्कार केला .

 यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, विनायक महिंद्रकर आदींसह पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 
Top