उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद ही संस्था 1962 पासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अविरत कार्यरत आहे. यामध्ये फार्मसी नर्सिंग महाविद्यालय तसेच पॅरामेडिकल कोर्सेस फार्मसी चे संशोधन केंद्र तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रा मध्ये अग्रेसर असलेली संस्था या संस्थेचा शैक्षणिक गुणवत्ता पाहून केंद्रीय सहकार मंत्रालय नवी दिल्ली ने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता यांचा विचार करून व विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनामध्ये वाव मिळण्यासाठी केशवराज मल्टीस्पेशालिटी को-ऑपरेटिव हॉस्पिटलला व संशोधन केंद्रास मान्यता दिलेली आहे या हॉस्पिटल मार्फत बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग या दोन्ही सेवा चोवीस तास कार्यरत राहणार आहेत यामध्ये अंतर रुग्ण विभागामध्ये वैद्यकीय तसेच सर्जरी, बाल रोग तज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती विभागातील अस्थीरोग विभाग तसेच हृदयरोग, न्यूरोलॉजी, किडनी तज्ञ, श्वास रोग तज्ञ, इत्यादी आजारावर देश व विदेशातील अत्याधुनिक उपलब्ध तंत्रज्ञानाद्वारे निदान व उपचार केले जातील त्याचबरोबर एम. आर. आय. कलर डॉपलर सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, या सर्व अद्यावत मशीन उपलब्ध आसून हे केंद्रीय रुग्णालय मूल्यांकन प्राधिकरण नवी दिल्ली यांचे मानकाप्रमाणे 200 आंतररुग्ण क्षमतेचे रुग्णालय व शैक्षणिक व संशोधन केंद्र असून नवीन आजार उपचार संशोधन केंद्र चालू होणार आहे व हे उस्मानाबाद शहरांमध्ये प्रथमच बहु राज्य स्तरीय रुग्णालय होनार आहे याचा फायदा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्याती लोकांना मिळणार आहे. तसेच या हॉस्पिटल मार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्व वैद्यकीय योजनेचा व सर्व नामांकित विमा कंपन्यांचे विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती केशवराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक आदित्य सुधीर पाटील यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.

या पत्रकार परिषदेस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील, तसेच डॉक्टर हेमंत देशपांडे सर, डॉक्टर विशाल वडगावकर सर, डॉक्टर कृष्णा उंद्रे-देशमुख, डॉक्टर मंजुळा आदित्य पाटील, अभिराम पाटील इत्यादी उपस्थित होते 

 
Top