उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  शहरातील गोरे कॉम्पलेक्स कार्यालयात कवी गझल कार साहित्यीक युवराज नळे लिखित ७ व्या पुस्तकाचे सोलापूर येथील प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले या निमित्त उस्मानाबाद पर्यटन विकास समितीच्यावतीने उ.प .वि .स .अध्यक्ष युवराज नळे यांचा शाल,फेटा, श्रीफळ , पुष्पगुच्छ , पर्यटन माहिती पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला  सर्व पदाधिकारी सदस्यगण या प्रसंगी डॉ. अभय शहापूरकर, कवी कलाध्यापक राजेंद्र अत्रे, अब्दुल लतिफ ,ॲड राज कुलकर्णी कलाध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ , गणेश वाघमारे, बाबा गुळीक, भागवत घेवारे , सहशिक्षक हणमंत पडवळ, रवींद्र शिंदे, सुदेश माळाळे , अविनाश मुंडे , दिपक पांढरे , मच्छिंद्र चव्हाण उपस्थित होते . सर्व सदस्य गण मान्यवरांनी मनोगतात युवराज नळे कला,क्रिडा, गायन, वादन, साहित्य, राजकीय क्षेत्रात संघर्षातून सर्वत्र प्रगती केली असून यापुढे असेच सर्व कले सोबत साहित्य सेवा व निर्मिती करित राहुन उस्मानाबाद पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ख्याती जगभर प्रसिद्ध कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहतील अश्या शुभेच्छा पर  मनोगत व्यक्त करण्यात आले . सुत्र संचालन गणेश वाघमारे यांनी केले तर बाबा गुळीक यांनी आभार मानले.

 

 
Top