वाशी/ प्रतिनिधी  -

 उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तथा वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गोळीबाराचा हा प्रकार दिल्ली येथील रेन्यू सूर्या रोशनी कंपनीच्या पवनचक्की टेंडरवरून झाला असल्याचा पुरवणी जबाब बिक्कड यांनी दिला आहे. 

कंपनीचे के राजाकुमार व कंपनीचा वेंडर कुलदीप देशमुख यांनी घडवून आणला असावा असा संशय बिक्कड यांनी जबाबात व्यक्त केला आहे. या पवनचक्की कंपनीचे काम उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात सुरु असून त्यांना मोठा राजकीय वरदहस्त आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपासाची चक्रे झपाट्याने फिरवण्यास सुरवात केली आहेत.


 
Top