उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरातील  सिद्ध गणेश मंदिर भानुनगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी माजी नगर अध्यक्ष मा.मधुकरराव तावडे,सचिन तावडे,मा.धर्मवीर कदम, गटशिक्षण अधिकारी मा.प्रकाश पारवे, मा.सुभाष बनसोडे,मा. नेताजी साळुंके,मा.प्रताप मायभाटे,मा. नितीन तावडे,बालाजी तांबे सर,कुणाल निंबाळकर,यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी गुणवंत विद्यार्थी, प्रेरणा ग्रुप चे सर्व सदस्य, परिसरातील सन्माननीय नागरिक उपस्थित होते.. 

 
Top