उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने समाजातील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये यश संपादन करणाऱया विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सिध्दीविनायक परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तर लातूर येथील जोशी कोचिंग क्लासचे संचालक प्रा. सुधाकर जोशी, उस्मानाबाद येथील उद्योजक संतोष शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथील परिमल मंगल कार्यालयात  हा कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  

प्रास्ताविकात ऍड. अभय पाथरुडकर यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा आढावा ही त्यांनी यावेळी घेतला.

यावेळी इयत्ता दहावीतील 46 तर इयत्ता बारावीतील 39 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गजानन कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार अजय नाईक यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरीकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.


 
Top