वाशी  / प्रतिनिधी-

शिवसेनेचे उपनेते तथा माजी जलसंधारण मंत्री भूम-परंडा-वाशी आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या वतीने आज वाशी तहसील कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते.त्या अनुषंगाने आज वाशी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले या सर्व शेतकऱ्याचे व नागरिकांचे प्रश्‍न आमदार तानाजीराव सावंत साहेब यांनी सोडवुन सर्वसामान्य जनतेला न्याय दिला.

आमदार तानाजीराव सावंत  यांनी आज वाशी तहसील कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते,यामध्ये प्रमुख  वीज वितरण कंपनी,तहसील कार्यालय,पंचायत समिती, कृषी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आदी विषयाला अनुसरून अनेक नागरिकांनी तक्रारी अर्ज दाखल केले होते, यावेळी सर्व विभागाचे मुख्य अधिकारी या ठिकाणी जनता दरबारात उपस्थित होते. उपस्थित सर्व जनतेच्या तक्रारी ऐकून घेऊन आमदार सावंत यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना उभे करून तक्रारी सोडविण्यास भाग पाडले. यावेळी विजेच्या प्रश्नावरून वाशी चे अभियंता शेंद्रे यांची आठ दिवसात बदली करणार असल्याचे सांगितले.यावेळी रखडलेले फेरफार रस्त्याचे वाद यावरून तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना आमदार सावंत यांनी खडे बोल सुनावले,हातोला साठवण तलाव व कडकनाथवाडी साठवण तलाव या दोन्ही तलावाच्या गळती बाबतीत अधिकाऱ्यांना सूचना देऊन, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. हातोला साठवण तलाव मध्ये पाण्याची गळती थांबवण्यासाठी काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये वाशी तालुक्यातील सर्व कृषी दुकानांमध्ये खत व बियाण्याचा तुटवडा होणार नाही तसेच बोगस बियाणे विक्री केली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश वाशीच्या तहसीलदारांना दिले व आजच्या जनता दरबार मधील सर्व प्रश्न 15दिवसात मार्गी लागले नाहीत तर येणाऱ्या पंधरा दिवसानंतर नंतर पुन्हा जनता दरबार घेणार असल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले.

यावेळी आमदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या सोबत शिव सेनेचे जिल्हा संघटक कथा माजी पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे ,प्रशांत चेडे,चंद्रकांत सरडे, युवराज कोकाटे, तालुका संघटक शिवहार स्वामी, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर,माजी युवा सेना तालुका प्रमुख बाळासाहेब मांगले, विकास मोळवणे,नागनाथ नाईकवाडी,बिबीशन खामकर, दिनकर शिंदे, अतुल चौधरी, नितीन रणदिवे, रंजीत घुले,महेश आखाडे यांच्यासह  आदी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच वीज वितरण कंपनीचे उस्मानाबाद येथील अधिकारी पाटील,वाशी चे तहसीलदार नरसिंग जाधव, वाशी चे गटविकास अधिकारी राजगुरू, पोलीस निरीक्षक दळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिंदे,आदी सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top