तुळजापूर  / प्रतिनिधी-

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोमवार  ( दि . ६ ) होणाऱ्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी शिववरदायिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या चरणी १०८ कवड्याच्या सात माळा व देवीचरणी अर्पण केलेले कुंकू , शिरकाई देवीसाठी मानाची साडी - चोळी हे सर्व साहित्य शनिवार  ( दि .४ ) रायगडाकडे रवाना करण्यात आले .

शनिवारी सकाळी श्री तुळजाभवानी मातेची दुग्धाभिषेक पूजा झाल्यानंतर देविजीस वस्त्रोलंकार घालण्यात आले . यानंतर नित्योपचार पूजा संपन्न झाली . देविजींच्या चरणी सात अंबुकी कवड्यांच्या माळा , कुंकू देवीचरणी लावून शिरकाई देवीची मानाची तुळजापूर येथील साडी - चोळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम,  तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, सचिन ताकमोघे , भोपे मंडळाचे अमर परमेश्वर,  विकास मलबा  आदीच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे रायगड सदस्य देवीच्या चरणाचे कुंकू प्रा . सतीश खोपडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले . हे सर्व साहित्य शुक्रवारी ( दि . ४ ) रायगडावर पोहचणार असून यातील सात कवड्याच्या माळा रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास घालण्यात येणार आहेत . कुंकू सदरेवरील महाराजांच्या पुतळ्यास लावण्यात येते .

 
Top