उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऑडिटर्स कौन्सिल अ‍ॅन्ड वेल्फेअर असोसिएशनचा उत्कृष्ट लेखा परीक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्मानाबाद येथील अनिल किसनराव पाटील यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 ऑडिटर्स कौन्सिल अ‍ॅन्ड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातून आणि विभागातून प्रथम व राज्यातून तिसरा पुरस्कार उस्मानाबाद येथील अनिल किसनराव पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांच्या हस्ते नुकताच कराड येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उस्मानाबादच्या सुपुत्रास मिळालेल्या या बहुमानाबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार राजाराम केलुरकर, संतोष सरगुले, सिद्धेश्वर लोंढे आदी उपस्थित होते.


 
Top