उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यतींसाठी  National Portal For Transgender Persons- https//:transgender.dosje.gov.in राष्ट्र्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयंपथीय व्यक्तीना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालय यांच्या 20 मे 2022 च्या पत्रानुसार तृतीयपंथीय व्यक्तींना तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करुण देण्यासंबधी स्वयंसेवी संस्था तसेच या क्षेत्रात काम करण्या-या इतर संस्थाच्या सहाय्याने दि.06 जून 2022 रोजी एकदिवसीय शिबीराचे आयोजन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सभागृहात करण्यात आलेले आहे.जिल्हायातील सर्व तृतीयपंथीयांनी या शिबीरास उपस्थित राहावे असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.


 
Top