उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शेकतोच शिवाय मनावरही चांगले संस्कार करु शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.

  आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीतून उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात पोलीस मुख्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालये व सर्व पोलीस ठाणी स्तरावर योग दिन साजरा करण्यात आला. तसेच या निमीत्ताने उस्मानाबाद पोलीस व बार्शी येथील शहा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयातील अलंकार सभागृहात रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले. या शिबीरात पोलीस अधिकारी- अंमलदार यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवल्याने एकुण 35 युनिट रक्त संकलीत झाले.


 
Top