वाशी/ प्रतिनिधी  -

उस्मानाबाद जिल्ह्यात नात्याला काळिमा फसणारी घटना घडली असून सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्यास वाशी पोलिसांनी अटक केली आहे. सख्या सासऱ्याने सुनेवर वारंवार बलात्कार केल्यानंतर अत्याचारला कंटाळून तिने भेटायला आलेल्या बहिणीला ही घटना सांगितल्याने याला वाचा फुटली. या अत्याचाराबाबत नवरा, सासू यांना सांगितले असता, त्यांनी सुनेला धमकी देत या घटनेवर पांघरून टाकले.उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी येथील ही घटना असून नवरा भोळसर असल्याचा फायदा घेत सासऱ्याने सुनेवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या ६ महिन्यापासून सासरा अत्याचार करीत होता. पोलिसांनी गुन्हा नोंद करीत अवघ्या एक तासात आरोपी सासऱ्याला अटक केली. वाशी येथील पोलीस निरीक्षक सुरेश दळवी यांनी ही कारवाई केली असून कौटुंबिक अत्याचारच्या घटना बाबत महिलांनी व मुलींनी तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे.

वाशी तालुक्यातील एका गावातील एक २४ वर्षीय महिला तिच्या घरी नेहमी प्रमाणे झोपली असता सासरा तिच्या जवळ गेला व त्या महिलेचे तोंड दाबून तिच्यावर • बळजबरीने लैंगिक अत्याचार केला व हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तसेच दोन्ही मुलापासून तिला वेगळे करन्याची धमकी दिली. गेली अनेक महिने हा अत्याचार सुरूच असल्याने अखेर तिने हिम्मत दाखवीत या प्रकाराला वाचा फोडली. या अत्याचार बाबत तिने अनेक वेळा पतीला सांगितले मात्र तो भोळसर असल्याने वडिलांची बाजू घेत होता, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पती, सासरा, सासू व आजे सासू यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच भूमचे उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करीत सासला तात्काळ अटक केली. उपनिरीक्षक के. डी. जगताप हे तपास अधिकारी आहेत. 

 
Top