उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि.27 डिसेंबर 2019 नुसार महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आज अखेर एकूण 73 हजार 404 लाभार्थी शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दि. 08 जून 2022 पर्यत 71 हजार 863 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी 79 हजार 484 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम रूपये 515 कोटी 95 लाख रक्कम जमा करण्यात आलेली आहे. शेतक-यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. दि.08 जून 2022 अखेर जिल्हयातील एक हजार 541 शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

  ज्या शेतक-यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतक-यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर  आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top