उस्मानाबाद / प्रतिनिधी-                   

विद्यार्थ्यांनी गुणवत्ते बरोबरच सुसंस्कार अंगीकृत करावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख  यांनी केले.   

  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे आज बारावी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित केला होता . सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंग्राव देशमुख बोलत होते. तर प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ.एस ए घोडके व उपप्राचार्य बी.एस सूर्यवंशी हे होते.

 प्राचार्य डॉ.जयसिंग्राव देशमुख आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कष्टाची व प्रामाणिकतेची कास धरायला हवी. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एका तपस्वी शिक्षक व्यक्तींनी स्थापन केलेली संस्था आहे. डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांची रुजवण समाजातल्या तळागाळातल्या व्यक्ती पर्यंत करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. एकविसाव्या शतकामध्ये ज्ञानग्रहण करणारा विद्यार्थी हा संस्कारक्षम बनला पाहिजे असा आशावाद त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव  आगळे यांनी तर आभार प्राध्यापक एन आर आधाटे यांनी व्यक्त केले.

 
Top