परंडा / प्रतिनिधी-

  सामाजिक क्रांती बरोबरच आर्थिक प्रगती ही देखील शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते असे मत येथील तहसील कार्यालय परंडा येथे आयोजित केलेल्या लोकनेते राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 

 याप्रसंगी नायब तहसीलदार सुजित वाबळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती परंडा येथील पाकले सी जे ,शाखा अभियंता बारस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुलकर्णी, मंडळ अधिकारी पवार डी टी  ,एस के शेख ,पेशकर अण्णासाहेब बनसोडे ,मोहन दादा बनसोडे, धनंजय सोनटक्के, तलाठी कर्मचारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसीलदार सुजित वाबळे आणि डॉ शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात नुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना डॉ शहाजी चंदनशिवे म्हणाले की शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य  लक्षणीय होते. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कायदे केले, बुद्धीमान तरुणांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, विधवा पुनर्विवाह कायदा आंतरजातीय विवाह कायदा अशा अनेक कायदे केले. बहुजन समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के जागा राखीव ठेवण्या संबंधी कायदा करणारे एकमेव ते संस्थापक होते.शेवटी सहाय्यक प्रशासन अधिकारी सी जे पाखले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 
Top