उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र विधान परिषदेच्या झाले निवडणुकीत संख्याबळ नसताना महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य, भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला जे अभूतपूर्व यश मिळाले आहे, याबद्दल धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाडू वाटून, फटाके फोडून, फुले आणि गुलालाची उधळण करुन जल्लोष करण्यात आला.

 तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन फटाके फोडून गुलालाची उधळणकरुन विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top