ईट  / प्रतिनिधी-

 भूम तालुक्यातील ईट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थी व बदली झालेल्या शिक्षकांचा सोमवारी (दि.२०) सिद्धेश्वर मंदिरात जंगी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय असलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, माजी जि.प. सभापती तथा शिवसेना नेते अण्णासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुंदरराव हुंबे, जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.रेवण भोसले, उपसरपंच अनंत डोके, शासकीय ठेकेदार सुनिल देशमुख, युवासेनेचे तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, ग्रापं सदस्य सयाजीराजे हुंबे, माजी उपसरपंच शंभुराजे देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते इम्रान पठाण, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद वाडकर, काँग्रेस अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष समीयोद्दीन काझी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमेश्वर स्वामी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात दहावीत प्रथम आलेल्या दीक्षा बापुराव जाधव, द्वितीय वैष्णवी उमाकांत सुरवसे, तृतीय विनोद वाडकर व सायली सदानंद असलकर या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या वैष्णवी भरत भोईटे, अस्मिता राजेश कुमटेकर, सायली उध्दव लिमकर, अनिकेत अशोक हुंबे, साक्षी गंगाधर शिंदे, साक्षी नंदकुमार असलकर, सोहम सुनील बोबडे, श्रिया अशोक पवार, सानिका विजय जाधव, समृद्धी दत्तात्रय वेदपाठक, राजकुमार राजाभाऊ राऊत, तेजस तानाजी हाडोळे, प्रथमेश भागवत वाघमोडे, प्रतिक्षा श्रीकांत चव्हाण यांच्यासह शिक्षक उमेश कुर्वलकर, सुधाकर चव्हाण,दयानंद चौरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सहदेव हुंबे, सुत्रंसंचालन श्रीग़ाडे तर श्री.सातपुते यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी शिक्षक एल. एस. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अव्वल क्रमांक पटकवल्यास २१ हजाराचे बक्षीस

पुढील वर्षी ईट जिल्हा परिषद हायस्कूलमधून दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास २१ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ग्रापं सदस्य सयाजीराजे हुंबे यांनी केली. 


 
Top