तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी शनिवार दि. ४रोजी तिर्थक्षेञी तुळजापूरात येवुन श्री तुळजाभवानी चरणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बक्षिस रुपात मिळालेला चांदीचा गदा ठेवुन श्रीतुळजाभवानी चरणी  नतमस्तक होवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले .

यावेळी  तुळजापूर तालुका कुस्तीगीर परिषद अध्यक्ष आनंद  रोचकरी, उप महाराष्ट्र केसरी मारुती   वडा,  पैलवान बबलू धनके यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता पृथ्वीराज पाटील यास मानाचा फेटा बांधुन देविप्रतिमा भेट दिली.  यावेळी मल्ल व कुस्ती प्रेमी मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top