उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात केंद्रातील भाजपाचे सरकार सोनिया गांधी व राहुल गांधी यांना सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नोटीसा पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा छळ केला जात आहे. खोट्या प्रकरणात अडकवून काँग्रेसचा नाही, तर सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचे काम केंद्रातील भाजपाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या या दडपशाही आणि कूटनीतीविरोधात काँग्रेसचा कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरला आहे. यापुढे असे प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कुलदीप उर्फ धीरज कदम-पाटील यांनी दिला.

 केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी व इतर नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ आज  (दि.17) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने करुन तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन पाठविण्यात आले.

 यावेळी सर्वश्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिजीत चव्हाण, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, उपाध्यक्ष विलास शाळू, महिला जिल्हाध्यक्षा संगिता कडगंचे, जिल्हा कॉंग्रेस युवकाध्यक्ष चंद्रशेखर पवार, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, विधी विभाग जिल्हाध्यक्ष ॲॅड.विश्वजीत शिंदे,सेवा दल युवक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.प्रणित डिकले, मानवाधिकार विभाग जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालूकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, तालुकाध्यक्ष राजेश शिंदे, माजी प्रदेश उपाध्यक्षा डॉ.स्मिता शहापूरकर, जिल्हा महिला उपाध्यक्षा ज्योती सपाटे, महिला तालूकाध्यक्षा अंजली ढवळे, अलकाताई पाटील, कोषाध्यक्ष अशोक शेळके, जिल्हा सरचिटणीस दादा पाटील, अ‍ॅड.जावेद काझी, संजय घोगरे, भूषण देशमुख, उमेश राजेनिंबाळकर, सत्तार शेख, बाबूराव तवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण,  सत्तार शेख, धनंजय राऊत, सलमान शेख, अहमद चाऊस, आनंद घोगरे, सतीश इंगळगी, बालाजी माने, कोहिनूर सय्यद, जमील सय्यद, नियामत मोमीन, अलीमोद्दीन काझी, महादेव पेठे, प्रभाकर डोंबाळे, महेश पाटील, अभिमान पेठे, अ‍ॅड.हनुमंत वाघमोडे, रवींद्र सोनवणे, खालेद पटेल, मुहीब शेख, तुकाराम ढोरे, गोरख बोंबलट, संजय चाबुकस्वार, सदानंद बोंबलट, गणेश वाघमोडे, अतुल चव्हाण, आकाश चव्हाण, राजाभाऊ शेंडगे, दत्तात्रय मस्के, संजय कदम, प्रेमानंद सपकाळ, सचिन गायकवाड, शहबाज शिकलगार, जमीर सय्यद, शकील शेख, सुनील पाटील, अंकुश पेठे, नागनाथ जंगाले, संजय घोडके, प्रवीण पडवळ, अशोक पडवळ, सनद कांबळे, बाबुराव तवले, अशोक बनसोडे, संजय गजधने, कपील सय्यद यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top