उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयात २२ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षाचा फार्म भरला होता. परंतु प्रत्यक्षात २२ हजार ४९७ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी २१ हजार ८९५ विद्यार्थी परिक्षा उर्त्तीण झाले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयाचा १० वीचा निकाल ९७.३२ टक्के लागला आहे. 

विशेष म्हणजे दहावी परिक्षेत सुध्दा पास होण्याचे प्रमाण मुलींचेच जास्त आहे. नियमीत विद्यार्थी २२ हजार २२५  तर रिपीटर परिक्षा देण्यासाठी ७१० विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली होती. प्रत्येक्षात परिक्षा २१ हजार ८१७ तर रिपीटरमधून ६८० विद्यार्थ्यांनी परिक्षा िदली होती. नियमीत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २१ हजार ३४७ आहे. तर रिपीटर मधुन ५४८ विद्यार्थी पास झाले आहेत. 

 
Top