उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सैनिकी मुलांचे वसतीगृह आणी माजी सैंनिक विश्रामगृहासाठी एक वस्तीगृह अधीक्षक आणि एक विश्रामगृह पहारेकरी ही दोन पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धातीने रोजंदारी तत्वावर भरवयाचे आहेत.इच्छुक माजी सैनिक किंवा इतर नागरिकांनी 10 जून 2022 पर्यंत जिल्हा सैंनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत आणि 14 जून 2022 रोजी कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार(निं)यांनी केले आहे.

  मुलाखतीसाठी येतांना माजी सैंनिकाचे ओळखपत्र, डिसचार्ज बुक, आधार कार्ड आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे. या पदांसाठी सुभेदार,जेसीओ,सुभेदार मेजर किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेले माजी सैंनिक किंवा इतर नागरिकही अर्ज करू शकतात.

 
Top