उमरगा  / प्रतिनिधी-

तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा निषेधार्थ मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर निषेध रॅली काढून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या चौगुले यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी माजी तालुका प्रमुख सुरेश वाले, किल्लारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात या निषेध रॅली चा समारोप करण्यात आला. शिवसैनिकांनी आमदार चौगुले गद्दार असल्याच्या घोषणा दिल्या, या वेळी विष्णू पाटील, माधव सूर्यवंशी, संतोष कलशेट्टी, सुनील पाटील, शिवाजी मदने, रणजित सास्तुरे, दादा चौधरी, विनोद पवार, शैलेश पवार, योगेश भोळे, दीपक चव्हाण, स्वप्नील वाले, शांतू म्हेत्रे, विजय फडताळे,विष्णु शिंदे,चंदर पाटील, ज्ञानराज चव्हाण, बाळू काळे,आबासाहेब चौधरी, मनोज जमादार, मनोज मोरे,गणेश मुगळे, श्रीकर बिराजदार, विठ्ठल पवार, आदी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले होते.


 
Top