उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सध्या समाजात व्यसनाधिता वाढत आहे. समाजाचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा वेळी समाज सदृढ व्हावा, सद््विचारी व्हावा, यासाठी किर्तन प्रवचन करणाऱ्या महाराजांचा आजचा सत्कार असून समाजात सांप्रदायिकता वाढवत असल्यामुळे सत्कार करत असल्याचे प्रतिपादन रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांनी केले. 
अॅड. गुंड यांच्या मातोश्री व पिताश्री कै रुपामाता िवश्वनाथ गुंड यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. २७) प्रतिमापूजन व साधुसंतांचा सन्मान सोहळा करण्यात आला. त्याप्रसंगी अॅड.गुंड बोलत होते. कार्यक्रमास हभप पाडुंरंग लोमटे महाराज, हभप शंकराव झाडे महाराज, सुधाकर साळुंके महाराज,परमेश्वर शिंदे महाराज, सुदर्शन साखरे महाराज, अनंत पाटील महाराज, बाबुराव पुजारी महाराज, उद्योजक संजय पटवारी, िज.प.माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड-गुरूजी,  पत्रकार संघाचे धनंजय रणदिवे, रुपामाता संचालक  दत्तात्रय वैद्य, शंकरराव गाडे, संचालिका त्रिवेणबाई गरड, सुमन सावंत, सौ. सुलभा गुंड, अॅड. शरद गुंड, अॅड.अजित गुंड, सौ. ऐश्वर्या गुंड ,पत्रकार भिमाशंकर वाघमारे आदी उपस्थित हाेते. 
हभप पांडुरंग महाराज लोमटे म्हणाले की, अॅड. व्यंकट गुंड यांनी समाजातील ज्या माता-पित्यांचा मुले सांभाळ करीत नाहीत, अशा माता पित्यांसाठी वृध्दाश्रम सुरू करण्याचे कार्य हाती घेतले असून ते लवकरच पुर्ण होईल, तर  हभप बाबुराव पुजारी  यांनी  कै रुपाबाई या घरी येणाऱ्या सर्व संताचा ज्याप्रमाणे सन्मान करीत असत त्याप्रमाणे अॅड. गुंड यांनी सन्मान केला. ज्याप्रमाणे जिजाऊ माँसाहेबांची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. त्याप्रमाणे रुपामाता परिवारतर्फे समाजातील सर्व घटकांना मदत करण्याचे कार्य सुरू आहे. संत चरण ‘आपुलिया हिता, जो अस जगता, धन्य माता-पिता त्यांचीया’ या प्रमाणे अॅड. गुंड यांचे कार्य सुरू असल्याचे मत हभप साळुंके महाराज यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमात सर्व साधुसंत व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व संत गोरोबा काकांची प्रतिमा भेट देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांच्यासह सभासद, खातेदार, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 
Top