तेर / प्रतिनिधी-

ग्राम कृषी विकास आराखडा व राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालय पुणे यांनी नियुक्त केलेले पालक उपसंचालक  प्रवीण गावंडे यांनी मौजे वानेवाडी तालुका उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांची संवाद साधला . त्यांनी ग्राम कृषी विकास समिती सदस्यांशी चर्चा केली व शेतकऱ्यांना ग्राम कृषी विकास आराखड्याचे कृषी  विस्तारासाठीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमांचा आढावा घेतला.

   त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने शेती करणे त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टल वर सामूहिक शेततळे, फळबाग लागवड ,पॉलिहाऊस, शेडनेट इत्यादी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या खताच्या ग्रेड वरती  अवलंबून न राहता सोयाबीन पिकासाठी माती परीक्षण अहवालानुसार विविध ग्रेडच्या खतांचा वापर करावा असे सुचवले. यावेळी कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद ,तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख ,कृषी सहाय्यक वैभव लेनेकर ,सरपंच जयश्री उंबरे ,उपसरपंच गोविंद उंबरे ,प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे, सुभाष हिंगमिरे , दीपक घेवारे, प्रदीप घेवारे, दयानंद केसकर,महादेव कदम, अगरचंद पौळ, पांडुरंग उंबरे , नारद उंबरे, गणपती चव्हाण, मुकुंद उंबरे, दत्तात्रय कदम व कृषी मित्र शिवराज घेवारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top