उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बालविवाह रोखून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, स्वखर्चातून बालविवाह एक अभिशाप लघुपट चित्रित करून समाजात श्रीभ्रूण हत्या, हुंडाप्रथा आणि बालविवाह विरोधात जनजागृती करणे,दिव्यांग बांधवांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजकार्य करत असल्याबाबत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,शालेय शिक्षण महिला व बालविकास,इतर मागास बहुजन कल्याण विभाग व कामगार मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांनी  मंत्रालय मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

यावेळी स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिल गावंडे,पक्षाचे प्रवक्ते कमलाकर पवार,मंत्रालय विशेष कार्य अधिकारी रवींद्र शिसोदे, विजय बोरसे,अनिल भटकर, अमोल मेश्राम, गौरव जाधव, खाजगी सचीव अनुप खांडे आदी मान्यवरांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले दिव्यांग बंधू-भगिनी आदी यावेळी उपस्थित होते.

 
Top