उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व युवानेते मल्हारदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन  टाकळी (बेंबळी) ता. उस्मानाबाद येथे   करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात टाकळी (बेंबळी) व परिसरातील सर्व वयोगटातील ४२९ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन वि.का.से.स.संस्था चेअरमन तानाजी बापु गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी सरपंच काकासाहेब पाटील, गावातील सर्व युवक, माताभगिनी, जेष्ठ नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ.अनिश मैनी, डॉ.सचिन सोनवणे, डॉ. आकाश वाघमारे, डॉ. परवीन सय्यद, डॉ.मृणालिनी उजगारे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच फार्मासिस्ट वैभव ठाकुर, अगत भांडेकर, आशा कार्यकर्त्या यांनी परीश्रम घेतले. या प्रसंगी प्रास्ताविक सूर्याजी गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन वैभव व्यंकट पाटील यांनी केले.


 
Top