नळदुर्ग / प्रतिनिधी- 

सन २०१० साली नगरपालिकेच्या वतीने घरकुल योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधुन वसंतनगर येथे ५९ लाख रुपये खर्च करून तेथील नागरीकांच्या सोईसाठी भव्य असे सभागृह बांधण्यात आले होते. आज या सभागृहाची अवस्था अतीशय वाईट झाली असुन या सभागृहाचे दारे, खिडक्या तुटलेल्या आहेत. त्याचबरोबर सभागृहात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या सभागृहाला सध्या शौचालयाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या सभागृहावर झालेला खर्च अक्षरशा पाण्यात गेला आहे. सभागृहाच्या या अवस्थेला जबाबदार कोण याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

  हे सभागृह बांधण्यावर तब्बल ५९ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र सध्याची सभागृहाची अवस्था पाहिल्यानंतर हा लाखो रुपयांचा खर्च अक्षरशा पाण्यात गेल्याचे दिसुन येत आहे. याला जबाबदार कोण?याची चौकशी होऊन यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबरोबरच हे सभागृह दुरुस्त करून नागरिकांच्या सोईसाठी ते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.

 
Top